Breaking News

ढेबेवाडी येथे उद्या राष्ट्रवादीचा जाहीर मेळावा

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा सोमवार, दि. 30 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता ढेबेवाडी (ता. पाटण) येथील  बाजारतळावर आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे असणार आहेत.
या मेळाव्यास आ. शशिकांत शिंदे, आ. नरेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, प्रा. ना. फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ.  सौ. प्राची नरेंद्र पाटील, पाटण पंचायत समितीच्या सभापती सौ. संगिता गुरव, सदस्या सौ. सुनंदा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संजय देसाई,  पाटण अर्बन बँकेचे माजी चेअरमन मधुकर काळे (गुरूजी), व्हाईस चेअरमन शिवाजीराव शिंदे, पाटण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अ‍ॅड. अविनाश जानुगडे,  राष्ट्रवादीचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकरराव शेडगे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष  विशाल मोरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौ. पुष्पाताई जाधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस  कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.