यश शाह राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेता
अहमदनगर, दि. 20 - नवी मुंबई येथील डी.वाय.पाटल स्टेडियम येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात नगर येथील बॅडमिंटनपटू यश शाह याने अंतिम फेरीत मुंबईच्या तनिष सक्सेना या खेळाडूचा सरळ सेटमध्ये 21-18 व 21-8 असा पराभव करुन राज्याचे विजेतेपद मिळविले.
यश सध्या पुणे येथील चैतन्य नाईक यांच्याकडे बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत असून, पुण्याच्या 17 वर्षाच्या संघात त्याचा समावेश आहे.
या अगोदर 15 वर्ष वयोगटात त्याची राष्ट्रीय स्तरावर आग्रा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये राज्याच्या संघामध्ये निवड झाली होती. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे उद्योजक नरेंद्र फिरोदिया, हिंद सेवा मंडळाचे ब्रिजलाल सारडा, प्राचार्या अमरजा रेखी, संजय धोपावकर, संजय साठे , वाडिया पार्क बॅडमिंटन ग्रुपचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.