अहमदनगर केरला समाजाच्या वतीने नववर्ष स्वागत कार्यक्रम संपन्न
अहमदनगर, दि. 20 - अहमदनगर केरला समाजाच्या वतीने नववर्ष स्वागत कार्यक्रम संपन्न दि 15 जानेवारी रोजी संजोग मध्ये संपन्न झाला, कार्यक्रमचे उदघाटन एसीसी सेन्टरचे कर्नल सुनील भास्कर यांच्या हस्ते झाले यावेळी ऑटो रेजिमेंटचे लेफ्ट कर्नल मनोज कोलकेल , डी सी रेकॉर्डचे लेफ्ट कर्नल सुरेश , अय्यप्पा सेवा समितीचे अध्यक्ष के के शेट्टी फादर जॉन केरकत्तला , केरला समाजाचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले , ऐ एस कुरियन , के सुदर्शन याच्यासह मोठ्या संखेने कुटुंबा सह केरळ मधील मंडळी उपस्थित होती
प्रास्ताविकात बाबूशेठ म्हणाले सर्वधर्म समभाव श्री नारायण गुरु यांचा संदेश आहे त्यामुळे ख्रिसमस , नववर्ष स्वागत , आयप्पा मकर संक्रांति उत्सव हे सर्व या कालावधीत येतात म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करतो केरळ मधील जे लोक उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडले ते पूर्ण जगात स्थायिक झाले ते विवध धर्माचे असले तरी नगरमध्ये उत्सव एकत्र येउन साजरा करतो प्रत्येकाने समाजासाठी काम व स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम करावा. कर्नल भास्कर म्हणाले माझ्या वडिलांपासून नगरला केरला समाज आहे माझ्या वडिलांची इच्छा होती कि नगरमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार व्हावे , पण ती पूर्ण झाली नाही .पण मला आज आनंद आहे कि माझी पोस्टिंग नगरला झाली आहे नगरला जे येतात ते या मातीशी एकरूप होतात येथील सर्व उत्सवात त्याचा सहभाग असतो हि कौतुकाची बाब आहे, यावेळी मान्यवरांनी नववर्षाच्या शुभेछया दिल्या , नंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंतसिंग व बॉबी जोमन यांनी केले, कार्यक्रम यशश्वीतेसाठी राजू लक्ष्मण सुरेशकुमार , स्मिता विजू, साजीभट यांच्यासह सदस्यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन व केक कटिंग पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.