Breaking News

गॅसच्या ऑनलाईन देयकावर पाच रुपयांची सूट

नवी दिल्ली, दि. 04 - रोकडविहीन अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध माध्यमातून नवनवीन योजना आणल्या जात आहेत. आता घरगुती सिलिंडरचे (एलपीजी) ऑनलाईन देयक दिल्यावर पाच रूपयांची सूट जाहीर केली आहे. यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या ऑनलाईन व्यवहारांसाठीही अशा प्रकारची सूट देण्यात आली होती. त्यानंतर आता तेल कंपन्यांकडून प्रत्येक घरगुती सिलिंडरची खरेदी आणि पैसे ऑनलाईन भरल्यास पाच रूपयांची सूट जाहीर करण्यात आली. सिलिंडरची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्डाचा पर्याय उपलब्ध आहे.