पीएमपीएमएलमध्ये चोर्या करणार्या सराईत महिलांची टोळी गजाआड
पुणे, दि. 22 - पीएमपीएमएलमध्ये प्रवासा दरम्यान गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स चोरणार्या तीन महिलांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई 12 जानेवारीला करण्यात आली. यावेळी पोलिसांनी या महिलांच्या ताब्यातून 2 लाख 81 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.
नंदा चंद्रकांत जाधव (वय-51, रा.लिमयेवाडी, सोलापूर), गंगुबाई गणेश गायकवाड (वय- 42, रा.सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) आणि करुणा सुनील जाधव (वय-35, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे), असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.
अन्य दोन महिला फरार आहेत. अटक केलेल्या महिलांवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, अमृता राजाराम पाटील (वय-24, रा. समर्थ कॉम्पलेक्स, धनकवडी) या 12 जानेवारी रोजी सायंकाळी सिटीप्राईड सातारा रोड ते अहिल्यादेवी चौक, धनकवडी दरम्यान प्रवास करत असताना आरोपी महिलांनी त्यांची पर्स चोरली होती.
या पर्समध्ये 3 हजार 700 रुपये रोख आणि महत्वाची कागदपत्रे होती. त्यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी संबंधित महिलांना अटक केली असता तपासा दरम्यान, त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे उघडकीस आले.
पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे अधिक तपास करीत आहेत.