मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बँकांनी जनजागृतीत सहभागी व्हावे ः तानाजी शिंदे
पुणे, दि. 22 - मतदार जनजागृतीसाठी शहरातील सर्व बँकांनी सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत आज स्थायी समिती सभागृहात शहरातील बँक प्रतिनिधी यांचे समवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आचारसंहिता कक्षाचे प्रमुख सुरेश जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ.यशवंतराव माने, अण्णा बोदडे, मुख्यलेखापाल दिलीप लांडे यांच्यासह शहरातील 30 बँकेचे प्रतिनिधी व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बँकेच्या अधिकार्यांनी आपल्या विविध शाखांमध्ये मतदान जनजागृतीचे फलक, फ्लेक्स लावावेत तसेच एटीएम सेंटरवर मतदारांना आवाहन करणारे भिंतीपत्रक लावण्यात यावे.
तसेच यावेळी एका प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यावयाचे असल्याने महापालिकेच्यावतीने त्याविषयी माहिती देणारी पत्रके बँक खातेदारांना वितरण करण्यासाठी बँकांकडून सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व मतदार जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.यशवंतराव माने यांनी यावेळी केले.