लासलगाव मर्चंटस बॅकेला उत्कृष्ट बॅक पुरस्कार
नाशिक, दि. 22 - नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँकेचे संचालकांच्या प्रशिक्षक शिबीरात येथील दि.लासलगाव मर्चंटस बॅकेला उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवड समितीच्या मुल्यांकनानुसार लासलगाव मर्चंटस बॅकेला आपले उद्दिष्ट पूर्ण करुन 50 ते 100 कोटीच्या विभागात तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नाशिक जिल्हा अर्बन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष भास्करराव कोठावदे, कार्याध्यक्ष राजेंद्र राठी, कॉन्फरन्स अध्यक्ष विश्वास ठाकूर, समन्वयक अजय ब्रम्हेचा यांचे हस्ते बॅकेला गौरविण्यात आले. यावेळी बॅकेचे अध्यक्ष संजय कासट, उपाध्यक्ष सोमनाथ शिरसाठ, संचालक अशोक गवळी, पारस ब्रम्हेचा , सचिन मालपाणी, ओमप्रकाश राका, किसनराव दराडे, राजेंद्र घोलप हे उपस्थित होते.