Breaking News

दाऊद इब्राहिमची अमिरातीमधील 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, दि. 04 - 1993 सालच्या मुंबईतील बाँम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याविरोधात मोठी कारवाई संयुक्त अरब आमिराती सरकारकडून करण्यात आली आहे. दाऊदची तब्बल 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती सरकारकडून जप्त करण्यात आली आहे.
दाऊदच्या अरब देशांमध्ये अनेक बेहिशेबी मालमत्ता असून अनेक कंपन्यांमध्ये समभागही आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरबच्या दौर्‍यावर गेले असता अरब सरकारला दाऊदच्या संपत्तीचा तपशील देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर अरब सरकारने ही कारवाई  केल्याचे समजते. तर सक्तवसुली संचालनालयानेही सहा देशांना पत्र लिहून दाऊदची संपत्ती जप्त करण्याची विनंती केली होती. यामध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान, संयुक्त अरब आमिराती, सायप्रस आणि मोरक्को यांचा समावेश आहे. दरम्यान, दाऊदला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज येथील पत्रकार परिषदेत दिली.