Breaking News

भगवान बाबा महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

बुलडाणा, दि. 04 - स्थानिक भगवान बाबा कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची 186 वी जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी कु.श्रध्दा सोनुने ही विद्यार्थ्यांनी होती.
    3 जानेवारी हा क्रांतीज्योति सावित्री बाई फुले यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.अनेकदा कार्यक्रम होतात पण त्या  कार्यक्रमात मुलींना आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळत नाही, अशी खंत मुलींनी मराठी विभाग प्रमुख प्रा.विठ्ठल भानुसे यांच्याकडे व्यक्त  केली. तेव्हा फक्त  मुलींसाठीच असावा या द्रुष्टिकोणातुन या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.व्यासपीठावर अध्यक्षापासून तर सुत्रसंचालन, व्याख्यान व इतर सर्व ठिकाणी मुलीच  होत्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे आराध्य दवत भगवान बाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना कु.श्रध्दा सोनुने हिने सांगितले की, आज आपण म्हणतो मुलगा नसेल तर वंश खुटतो पण शरद  पवार साहेबांना एकच मुलगी आहे.म्हणून त्यांचा वंश खुटला असे होत नाही. यावेळी कु.आश्‍विनी मापारी, कु.आश्‍विनी मोरे, कु.साठे, यांनी सावित्रबाई यांचा  जीवनपट त्यांना आलेला विविध अनुभवातून मांडला .
   आज मोठया प्रमाणावर स्त्रीभ्रुणहत्या होत आहेत
हा धागा पकडून कु.जयश्री मापारी, कु.रूपाली दहातोंडे, कु.घायाळ, कु.खरात कु.शुभांगी जाधव, कु.आखाडे या विद्यार्थीनिने कविता सादर केल्या.  आपल्या  कवितेतून स्त्रीच्या कमी होत जाणार्‍या संख्येला पुरूषाप्रमाणे स्त्री सुद्धा जबाबदार आहे असे माडंले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.निशा शिंदे तर आभार  कु.आश्‍विनी घायाळ या विद्यार्थीनिने केले.या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागातर्फे करण्यात आले.