Breaking News

प्रगती वाचनालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन; सीटु संघटनेच्या महिलांचा पुढाकार

बुलडाणा, दि. 06 - स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातुन प्रगतीच्या शिखरांवर पोचविण्यासाठी अपार कष्ट सोसणार्‍या सावित्रीबाई फुले यांचा आदर्श प्रत्येक महिलेने  स्वतःसमोर ठेवावा. त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊनच सीटुच्या कामगार संघटनांमध्ये काम करणार्‍या महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी संघर्षात उतरवे, असे आवाहन  सीटु संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी पंजाबराव गायकवाड यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित अभिवादनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
स्थानिक प्रगती सार्वजनिक वाचनालयात सीटुतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला संघटनेच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमात सर्वप्रथम  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारदा इंगळे यांनी केले, तर प्रतिभा आराख यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला सुनिता मोरे, सुनीता पांडव, सुनिता जोध,  ज्योती खर्चे, नलीन गोरे, वृषाली डांगे, छाया देशमुख, प्रतिभा आराख, शारदा पोपळघट इत्यादी उपस्थित होत्या.