Breaking News

स्वस्तधान्य दुकानदारांविरोधात महिलांचा एल्गार

बुलडाणा, दि. 20 - शहरामध्ये प्रत्येक वार्डात व प्राागामध्ये स्वस्तधान्य दुकाने आहेत. परंतु शहरातील काही दुकानदार धान्याचे वितरण न करता अरेरावीची भाषा  करतात असा आरोप करीत शहरातीला विविध प्रभागामधील शेकडो महिला आज 19 जानेवारी रोजी येथील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयावर धडकल्या. या  महिलांनी रेशनींगवर धान्य मिळत  नसल्याची तक्रार तहसिलदार दिपक बाजड यांच्याकडे दिली. 
तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, शासनाने गरीब, दारिद्र रेषेखालील शिधापत्रिका धारकांना त्यांना मिळणार्‍या हक्काच्या  अन्न धान्य विविध योजना रास्तभाव राशन दुकानामध्ये राबविलेल्या आहेत. यामध्ये अन्न सुरक्षायोजना, अंत्योदय योजना, अन्नपुर्णा योजना, दारिद्य्रय रेषाखालील  बीपीएल योजना, शेतकरी स्वावलंबन योजना, राष्ट्रीय कुटूंब योजना, एपीएल योजना अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनाने सरकारी स्वस्त धान्य  दुकानामध्ये गरीब जनतेसाठी राबविलेल्या आहेत. परंतु शहरातील काही दुकानदार राजकिय क्षेत्रामध्ये वावरत असल्यामुळे गरीब जनतेवर दबाव टाकुन त्यांना  युनिट प्रमाणे मिळणारे अन्न धान्य देत नसुन गरीब जनतेला दादागिरी करुन अरेरावीची भाषा करतात. शासकिय गोडाऊनमध्ये अन्नधान्य नाही. चालन पास झाले  नाही, परमिट बनले नाही, असे सांगुुन गरीब जनतेला व गरजु नागरिकांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य देत नाहीत.  धान्य घेतल्यावर बिलाची पावती मिळत नाही,  काही दुकानदार तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आर्शिवादाने काळ्या बाजारात राशन दुकानाचे माल विक्री करतात. अशा दुकानदारांविरोधात  शासकिय समिती नेमुन उच्च स्तरावर सखोल चौकशी करुन त्यांचे राशन दुकानचे परवाने रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावर काही कार्यवाही  न झाल्यास येत्या 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी नगरसेवक मो. अझर, नगरसेवक अरविंद होंडे, वसीम शेख, नितीन श्रीवास्तव, मो. सोफीयान यांच्यासह नसिम बी सै. अशरफ, हुसनारा शे.  राजा, सबिना मो. जाहिर, गुलाबबी शे. रहिम, साबीना बी शे. सलीम, रजिया बानो शे. शब्बीर, शबानाा बी शे.खान, परवीन बी अहेमदशा, नाजेमा बी, अय्युबशा  हुसेनशा, सैअलताफ सै.खान, शे.लुकमान शे. उस्मान, सै. शाकीब सै. कदीर, शे. गफार शे. सुलतान, जाकेरा बी, लुकमान शे.वसिम यासह टिपू सुलतान चौक,  कमेला परिसर, शिवनेरी नगर, जुनागाव, गवलीपुरा, तेलगु नगर या भागातील  शेकडो महिला उपस्थित होत्या.