Breaking News

युरो किडस् स्कुलचे स्नेहसंमेलन उत्साहात

बुलडाणा, दि. 20 - येथील इंग्रजी माध्यमाची युरो किडस् स्कुलचे वार्षीक स्नेहसंमेलन दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नटराज हॉल चिंच परीसर येथे थाटात संपन्न झाले.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां सौ. वैशालीताई पडघान व सौ. मिनलताई आंबेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करून  सुरूवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यक्षा सौ. भारतीताई बोंद्रे, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांची  उपस्थिती लाभली होती.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या व संस्था अध्यक्षा यांनी स्नेहसंमेलनासाठी आलेल्या पालक व विद्यार्थांसमोर शिक्षणातून विद्यार्थांचा सर्वांगिन  विकास कसा साधता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन करतांना अनेक मौलीक सुचना केल्या. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल अवसरमोल यांनी कार्यक्रमाची रूपरेक्षा  मांडून युरो किडस् स्कुल राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सादर केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन शिंगणे मॅडम यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमा नंतर  शाळेत शिकणार्‍या चिमुकल्या विद्यार्थी व विदयाथींनीनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. त्यात विविध गाण्यावर विदयार्थींनीनी सादर केलेला नृत्यविष्कार  पालकाची पसंती मिळवून गेला. पालकांच्या टाळया व शबासकीच्या उद्गारांनी सभागृह दणानून गेल्याने कार्यक्रम सादर करणार्‍या विद्यार्थी व विद्याथीनींचा उत्साह  व्दिगुणीत झाला.
स्नेहसंमलनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचा शिक्षका सौ. ढवळे, सौ. शिंगणे, कु. नागवाणी, सौ. वाजगेताई, सौ. जाधव ताई व ढवळे सर  यांनी परीश्रम घेतले.