Breaking News

भारतीय संघात स्मृती मंधानाच्या जागी मोना मेशरामचा समावेश

नवी दिल्ली, दि. 22 - पुढील महिन्यात कोलंबोमध्ये होणा-या आयसीसी महिला विश्‍वचषक पात्रता फेरीसाठी स्मृती मंधानाच्या जागी मोना मेशराम हिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज याबाबत माहिती दिली.  स्मृती ही ऑस्ट्रेलियामधील एका स्पर्धेदरम्यान जखमी झाली होती. त्यामुळे तिच्या जागी मोना हिचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.