Breaking News

सर्व सामने जिंकण्याची भारतीय संघात क्षमता - धोनी

पुणे, दि. 13 - भारतीय संघात  सर्व प्रकारचे सामने जिंकण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने केले आहे. इंग्लंड  विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धोनी बोलत होता.  
क्रिकेट क्षेत्रात मला चांगले वाईट हे दोन्ही प्रकारचे अनुभव मिळाले. या प्रवासाचा मी खूप आनंद घेतला. चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या अनुभवांनी माझ्या  चेह-यावर हास्यच  असल्याचे  धोनीने नमूद केले . यावेळी धोनीने  विराट कोहलीचे कौतुक केले. विराट नेहमी स्वत:त चांगले बदल घडवत असतो, असे धोनी  म्हणाला.