Breaking News

ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा - जनरल बिपीन रावत

नवी दिल्ली, दि. 13 - लष्कराच्या कामकाजाबाबत ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लष्करप्रमुख  जनरल बिपीन रावत यांनी जवानांना केले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल व लष्करातील जवानांनी आपल्या व्यथा ध्वनीचित्रफितीच्या  माध्यमातून मांडल्याच्या पार्श्‍वभूमीवर रावत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. लष्करदिनाच्या पूर्वसंध्येला मी या माध्यमातून प्रत्येक  सैनिकापर्यंत हा संदेश पोहोचवत आहे. लष्कराच्या मुख्यालयात व अन्य कार्यालयांमध्ये सूचना व तक्रार पेटी ठेवण्यात आली असून त्याच्या माध्यमातूनही तुम्ही  तुमच्या तक्रारी नोंदवू शकता. निनावी पत्राद्वारेही करू शकतो, आम्ही त्याची ओळख जाहीर करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.