सांगलीत बहुजन क्रांतीचा उद्या मोर्चा
सांगली, दि. 18 - बहुजन क्रांती मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, शहरात सहा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 19 जानेवारी रोजी सांगलीतील कामगार भवन ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळा या मार्गावर काढण्यात येणार्या मोर्चात चार लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा अंदाज माजी महापौर विवेक कांबळे, संयोजन समितीचे प्रा. नामदेव करगणे याीं पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विविध जाती, धर्मात विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करुन त्यांच्या समस्या सोडविण्याच्या प्रमुख मागण्या घेऊन 19 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सांगलीतून मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत विवेक कांबळे म्हणाले की, बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, मराठा, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, लिंगायत, शीख, जैन आदी समाजावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम बहुजन क्रांती मोर्चातून होणार आहे. आमचा कोणत्याही जाती-धर्माला विरोध नाही. सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावे. अगदी ब्राम्हण समाजही त्यांच्या मागण्यांसाठी सहभागी होऊ शकतो. कष्टकरी, शेतकरी जनतेचा वर्षानुवर्षे दबलेला आवाज या मोर्चातून बाहेर पडणार आहे. वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांवर गेल्या काही वर्षापासून अन्याय सुरु आहे. हा अन्याय एकट्याने लढून दूर होणार नसल्याने एकतेचा मंत्र जपत आम्ही पुढे जात आहोत.
मराठा समाजास आरक्षण मिळाव, हीसुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम पर्सनल लॉ अबाधित ठेवण्यात यावा, अॅट्रॉसिटी कायदा शिथिल न करता आणखी कडक करण्यात यावा, यासह सर्व समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी नगरसेवक शेवंता वाघमारे, अरुण खरमाटे, राम कांबळे, नितीन कांबळे, निवांत कोळेकर, संगीता शिंदे, सुरेश चिखले आदी उपस्थित होते.