लिंगनूर खूनप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जन्मठेप
सांगली, दि. 18 - पाहुण्याची जमिन परस्पर विकत घेतल्याच्या रागातून महादेव भिमसू कुरणे (वय 40) यांच्यावर विळ्याने सपासप वार करुन खून केल्या प्रकरणी लिंगनूर येथील दोन सङ्घङ्घया भावांना जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. जी. ढमाळ यांनी जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. राजू आप्पासो पाटील (वय 30) व सुरज आप्पासो पाटील (वय 27) अशी शिक्षा सुनाविण्यात आलेल्यांची नावे आहेत. 21 जुलै 2012 रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. अल्हास चिप्रे यांनी अंतीम युक्तीवाद केला.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, मयत महादेव कुरणे यांनी लिंगनूर येथील आप्पासो शिदगोंड पाटील यांच्याकडून दोन एकर जमिन वार्षिक 40 हजार रुपये खंडाने कसासला घेतली होती. त्यापैकी एक एकर जमिन ही आप्पासो पाटील व एक एकर पाटील यांचे बेवनूर येथील पाहुणे परसू बसाप्पा चौगुले यांच्या मालकीची होती. परसू चौगुले त्यांची एक एकर जमिन विकणार असल्याचे समजल्याने महादेव कुरणे यांनी आप्पासो पाटील यांना विश्वासात न घेता परसू चौगुले यांच्याकडून परशुराम शंकर नलवडे यांच्या नावाने ही जमिन खरेदी केली. त्याचा राग आप्पासो पाटील, राजू व सुरज पाटील यांना होता. यातून कुरणे व पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. या वादात गावतील पोलिस पाटील यांनी मध्यस्थी करीत कुरणे यांना पाटील यांच्या शेतातील पाईपलाईन काढून घेण्यास सांगितले होते. कुरणे यांनी पोलिस पाटलांचा मान राखत शेतातील पाईप लाईन काढण्यासाठी पत्नी मनिषा, पुतण्या मनोज व शेतात काम करणारी मजूर शेवंता कांबळे यांना पाठविले होते. यावेळी राजू व सुरज पाटील यांनी त्यांना विरोध करीत पाईपलाईन काढण्यास मज्जाव केला होता. कुरणे यांना बोलावून आणा, मगच पाईन लाईन काढा असे त्यांनी कुरणे यांचा पुतण्या मनोज याला सुनावले.
पुतण्या मनोजने कुरणे यांना शेतात घडलेला प्रकार सांगितल्यानंतर कुरणे मनोज, पत्नी मनिषा यांच्यासह शेतात गेले. त्यावेळी राजू पाटील हा विळा तर सुरज पाटील का काठी घेऊन उभा होता. महादेव कुरणे यांना पाहताच पाटील बंधूनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ का करता, असे विचारताच राजू पाटील याने त्याच्या जवळील विळ्याने कुरणे यांच्या डोक्यात, कपाळावर, कानावर विळ्याने वार केले, तर सुरज पाटील याने कुरणे यांना काठीने डोके, पाठ, हात व पायावर बेदम मारहाण केली. यामध्ये महादेव कुरणे गंभीर जखमी झाले होते. कुरणे यांना वाचविण्यास गेलेल्या पुतण्या मनोज, पत्नी मनिषा यांनाही सुरज व राजू या दोघांनी ढकलून देत दमदाटी केली. कुरणे यांच्या पत्नी मनिषा यांच्या पोटावर व हातावर आरोपी सुरज याने काठीने मारहाण केली. मारहाण होत असल्याने मनोज व मनिषा यांनी आरडाओरडा केल्याने हङ्घेखोर घनास्थळावरून पळून गेले होते. त्यांनतर कुरणे यांचा दुसरा पुतण्या अमर याने त्याच्या जीपमधून जखमी महादेव कुरणे यांना उपचारासाठी तात्काळ मिशन हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. याबाबत कुरणे यांच्या पत्नी मनिषा यांनी सांगली गङ्घामीण पोलिस ठाण्यात राजू पाटील व सुरज पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार दोघा भावांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिरज गङ्घामीण पोलिस ठाण्याचे तात्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. आर. सावंत यांनी घटनास्थळाचा पंचासमक्ष पंचनामा करुन तपास सुरु केला होता. तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पंचासमक्ष जप्त केली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांचे जबाब नोंदवून भक्कम पुरावे गोळा करीत आरोपींच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधिश डी. जी. ढमाळ यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे 9 साभदार तपासण्यात आले. मयत कुरणे यांची पत्नी मनिषा कुरणे, पुतण्या मनोज यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. गुन्ह्यात वारपलेली हत्यारे, पंच कृष्णा शिवणे, वैद्यकिय अधिकारी डॉ. योजना कडूसकर यांचा जबाब गङ्घाह्य धरुन आरोपी राजू पाटील व सुरज पाटील या दोघांना कलम 302 अन्वेये दोषी धरुन ढमाळ यांनी जन्मठेप व प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अॅड. उल्हास चिप्रे यांनी अंतीम युक्तीवाद केला. या खटल्यामध्ये जिल्हा सरकारी वकील यांच्या कार्यालयातील महिला पो. शि. डांगे व मिसाळ यांचे त्यांना सहकार्य लाभले.