भाजप नगरसेवकांकडे नितिमत्ता नाही ः गौतम पवार
सांगली, दि. 18 - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या महापालिकेतील सत्कारावरुन टीका करणार्या भाजपच्या दोन नगरसेवकांकडे नीतीमत्तचा अभाव आहे. त्यांनी भाजपचे की स्वाभिमानी आघाडीचे नेते नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकारांशी बोतांना लगाविला.
गेल्या आठवड्यात महापालिकेतर्फे मंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. खोत यांनी काँग्रेसचा सत्कार स्वीकारल्याबद्दल नगरसेवक युवराज बावडेकर व स्वरदा केळकर यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत पवार बोलत होते. ते म्हणाले की, मंत्री खोत यांचा महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
महापालिका म्हणजे सर्व पक्षांचे नगरसेवक आलेच. खोत यांनी प्रथम महापौरांच्या कार्यालयाला भेट दिली. नंतर ते स्वाभिमानीच्या कार्यालयात आले होते. त्यांच्यावर टीका करणार्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी, आधी ते कुठल्या पक्षात आहेत, हे जाहीर करावे. विधानपरिषदेवेळी अर्ज भरताना या नगरसेवकाने भाजपतर्फे अर्ज भरला होता. विभागीय आयुक्तांकडे मात्र आम्ही स्वाभिमानीचे नगरसेवक आहोत, असे पत्र दिले आहे. त्यांच्याकडे नीतीमत्ताच उरलेली नाही. महासभेच्या डायसवर बसून या मंडळींनीच ड्रेनेज योजनेची वाट लावली. आता अमृ योजनेची वाट लावण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.