Breaking News

दत्तात्रय सुर्वे-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी

ढेबेवाडी, दि. 22 (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील अंबवडे येथील धडाडीचे कार्यकर्ते, माजी सरपंच, दत्तात्रय सुर्वे-पाटील यांना मंद्रुळकोळे गणातून राष्ट्रवादीच्या  वतीने उमेदवारी मिळावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
दत्तात्रय-सुर्वे पाटील हे अंबवडे ग्रामपंचायतीचे गेली 25 वर्ष सरपंच होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विकास साधला आहे. तसेच ते 17 वर्षे पाटण  अर्बन बँकेचे संचालक व गावातील विकास सोसायटीचे चेअरमन होते. सुर्वे यांचा गांवाबरोबरच इतर गांवाचा मोठा संपर्क आहे. त्यांना होऊ घातलेल्या पाटण  पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी द्यावी त्यामुळे मंद्रुळकोळे गणाचा विकास होणार आहे, अशी येथील नागरीकांची मागणी आहे. या  मागणीचा पक्षश्रेष्ठी विचार करतील, अशी भावना येथील जनतेची आहे.