उंब्रज आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग; मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा
उंब्रज, दि. 22 (प्रतिनिधी) : अल्पवयीन विद्यार्थिनींच्या विनयभंगप्रकरणी येथील जागृती आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकासह एक शिक्षक व शिपाई मिळून तिघांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल नोंद झाला. संशयितांमधील शिक्षकास पोलिसांनी रात्री उशीरा चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र मुख्याध्यापक व शिपाई पसार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना उजेडात आल्यानंतर प्रांताधिकारी किशोर पवार, पोलीस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर, तहसीलदार राजेंद्र शेळके व अन्य अधिकारी रात्री उशीरापर्यंत उंब्रजमध्ये तळ ठोकून बसले होते.
उंब्रज येथील जागृती आश्रम शाळेची तपासणी काही महिन्यापूर्वी शासकीय महिला समितीने केली होती. या तपासणीत समितीला अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्याबाबतचा अहवाल समितीने जिल्हाधिकार्यांना सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी शाळेस भेट दिली होती. यावेळी शाळेतून अनेक तक्रारी पुढे आल्या तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या गैरवर्तणुकीचा पाढा वाचला. यावेळी पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीने आपबिती कथन केली. तिच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी पोलीस उपअधिक्षक राजलक्ष्मी शिवणकर दाखल झाल्या. त्यांनी थेट आश्रमशाळेत जावून या अनुषंगाने चौकशी सुरू केली. त्यानंतर काही वेळातच प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके शाळेत दाखल झाले. उंब्रज पोलीस ठाण्याचे सपोनि कुमार घाडगे, तळबीड पोलीस ठाण्याच्या सपोनि विद्या जाधव याही शाळेच्या आवारात आल्याने आश्रम शाळेत नेमके काय झाले आहे? याबाबत स्थानिक नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू झाली. प्रशासकीय व पोलीस अधिकारी सायंकाळी उशीरापर्यंत शाळेत तळ ठोकून चौकशी करत होते.
सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार हे उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल आले. त्यांनी शाळेत झालेल्या चौकशी प्रक्रियेची व पिडीत मुलीच्या तक्रारीची माहिती घेतली. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीची फिर्याद नोंदवून घेण्यात आली.
माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, असे म्हणत शाळेतील शिक्षकाने छेडछाड केल्याचे पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून या शाळेतील शिक्षक व त्यास मदत केल्याप्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक व शिपाई यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयीत शिक्षकास रात्री उशीरा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरू केली. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि विद्या जाधव करत आहेत.