Breaking News

कॅशलेस व्यवहार पध्दती ही देशातील सर्वात मोठी अर्थक्रांती ः तन्वर

अहमदनगर, दि. 01 - कॅशलेस व्यवहार पध्दती ही देशातील सर्वात मोठी अर्थक्रांती आहे. देशातील विषमता नष्ट करुन समानता प्रस्थापित करण्यासाठी रोखमुक्त  व्यवहाराची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा सहकारी बँकेच्या महिला विकास अधिकारी (बचत गट विभाग) विद्या तन्वर यांनी व्यक्त केले.
संकल्प युवा फौंडेशन, जी.के. फिटनेस क्लब व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण रोड, शिवाजीनगर येथे घेण्यात आलेल्या रोखमुक्त व्यवहार पध्दती  मार्गदर्शन शिबीरात तन्वर बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, जय युवा अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष  अ‍ॅड.महेश शिंदे, संकल्प युवा फौंडेशनचे अध्यक्ष संजय गवारे, जी.के. फिटनेस क्लबचे संचालक भैरवनाथ खंडागळे, पोपट बनकर, ज्ञानेश्‍वर हिरे, धीरज ससाणे,  पै.नाना डोंगरे, अ‍ॅड.भानुदास होले, नयना बनकर, पोपट सोनवणे, सचिन कोतकर, मेजर शेंडकर, सुवेंद्र आढाव, खंडेराव बेरड, शामराव आंधळे, गणेश खंडागळे  आदि उपस्थित होते.
प्रास्ताविकात अ‍ॅड.महेश शिंदे यांनी नेहरु युवा केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या रोखमुक्त व्यवहार जनजागृतीने आर्थिक साक्षरता घडून रोखमुक्त अर्थव्यवस्था  यशस्वी होणार असल्याचे सांगून, गांवपातळीवर घेण्यात आलेल्या 300 पेक्षा जास्त रोखमुक्ती व्यवहार मार्गदर्शन शिबीराची माहिती दिली. विद्या तन्वर यांनी  उपस्थित युवक, युवती व नागरिकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, मोबाईल व ई बॅकिंगद्वारे होणारे व्यवहारा संदर्भात मार्गदर्शन केले. रोखमुक्त  व्यवहाराने पारदर्शकता येवून, भ्रष्टाचाराला लगाम लागणार असल्याचे बाबाजी गोडसे यांनी सांगितले.