Breaking News

जिल्हापरिषद सदस्य भाऊसाहेब गुंड यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे, दि. 13 - मावळ तालुका राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पुणे जिल्हापरिषदेचे सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत आण्णा ढोरे, मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, लोणावळा नगरपरिषदेचे गटनेते भरत हारपुडे, भाजपा  युवा मोर्चाचे मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष विनोद साबळे, मावळचे सचिव सखाराम कडू, युवामोर्चाचे कोषाध्यक्ष व  माजी सरपंच अर्जुन पाठारे, चंद्रकांत गाडे, मनोहरभाऊ पेवेकर, पवनभाई खिलानी, राजेंद्र चव्हाण, दत्तात्रय सोनवणे आदी उपस्थित होते.
ऐन जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या तोंडावर नाणेमावळ राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते असलेल्या गुंड यांच्या प्रवेशाने नाणेमावळ राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे.  गुंड यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव व डोंगरगावचे माजी उपसरपंच संजय जायगुडे व लोणावळ्यातील उद्योजक शंकरराव गाडे यांनी  देखील भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकी दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार व मावळचे  आमदार संजय तथा बाळा भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर प्रवेश झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मावळातील अंतगत गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे गुंड यांनी यावेळी सांगितले.