Breaking News

पदवीधर उमेदवारांचा मोर्चा शहरात


। गेल्या पंधरा नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार नंतर आता उमेदवारांनी मोर्चा नगर शहराकडे वळवला  । दोन दिग्गजांची ताकद पणाला 

अहमदनगर, दि. 30 - गेल्या पंधरा दिवसापासुन नाशिक पदविधर मतदारसंघातील पाच जिल्हयात गाठीभेटी घेवून अर्जभरलेल्या उमेदवारांनी पायपीट केली आहे.  परंतु सर्वांत जास्त मतदान हे अहमदनगर शहर आणि संगमनेर या भागात असल्याने या भागाकडे सर्वच उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. या निवडणुकीत  अहमदनगरचे डॉ.सुधिर तांबे आणि भारतीय जनता पक्षाचे नाशिक येथील डॉ. प्रशांत पाटील यांच्यात प्रामुख्याने होणारी लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत  आहेत. मात्र आता या दोन्ही उमेदवारासह इतर उमेदवारांनीही या निवडणुकीत आपले लक्ष आता नगर जिल्हयाकडे वळवले असल्याचे चित्र शनिवार पासून दिसत  आहे.
मागील पदवीधर निवडणुकीत डॉ.तांबे यांनी सुहास फरांदे यांचा  मोठ्या मतांनी पराभव केला होता. परंतु यंदा सत्ता ताब्यात नसल्याने आणि ऐनवेळी अनेक बदल  झाल्याने याचा फायदा डॉ.सुधिर तांबेने होणार की डॉ.प्रशांत पाटील यांना होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचा प्रचार  यंत्रणा आणि नेत्यांची लगबग नसल्याने ही निवडणुक चुरशी झाली असली तरी याकडे अनेकांनी कानाडोळा केला आहे. त्यामध्येच सध्या सुरु असलल्या जिल्हा  परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे या निवडणुकीकडे थोड्या प्रमाणात का होईना नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे जिल्हयात पदवीधर मतदार संघातील मतदारांना भेटण्यासाठी दोन दिवस सर्वांना कोठी कसरत करावी  लागणार आहे.
बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीसाठी संपुर्ण ताकद डॉ.सुधिर तांबे यांच्यासाठी उभी केली असुन त्यांनी जिल्हयातुनच तांबेना मताधिक्य मिळवुन देण्यासाठी  शहरासह जिल्हयात गाठीभेटीवर भर दिला आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवारच विजय होणार असल्याचा विश्‍वास दर्शवला आहे. या निवडणुकीत  राष्ट्रवादीची साथही काँग्रेसला मिळाल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
उमेदवार डॉ.पाटील केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुरेश भामरे यांचे जावई असल्याने थोरात यांच्या प्रमाणेच सध्या भामरे यांचीही ताकत पणाला लावली आहे.  नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत गाठीभेटी नंतर आता पाटील हे ही नगर शहरात सोमवारी किंवा मंगळवारी दाखल होणार असल्याची माहिती  विश्‍वासनिय सुत्रांकडुन मिळाली आहे. 20 वर्षांत पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व पुन्हा प्रथापित होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागेले आहे.
पदवीधरची जिल्हयात आजपासून रणधुमाळी
या निवडणुकीत चिन्ह नसल्याने तसेच पसंती क्रमांक असल्याने कोणत्याही पक्षाचा झेंडा अथवा बँनर सध्यातरी पहावयास मिळत नाही. चार जिल्ह्यातील  गाठीभेटीनंतर आणि मतदारांना आवाहन केल्यानंतर आता सर्वांनीच आपला मोर्चा सर्वाज जास्त मतदार असलेल्या अहमदनगर जिल्हयाकडे वळवला असुन दोन  दिवस पदविधरचीच रणधुमाळी शहरात रंगणार असल्याचे चित्र आहे.