Breaking News

खादीच नाही नोटांवरुनही गांधीजी गायब होतील : अनिल विज

चंदीगड, दि. 15 - साक्षी महाराजानंतर आता हरियाणातील भाजप नेत्याने पुन्हा वादग्रस्त आणि धक्कादायक विधान करुन नवा वाद ओढावून घेतला आहे. लवकरच गांधीजी नोटांवरुनही गायब होतील, असं विधान या महाशयांनी केलं आहे. अनिल वीज असं त्यांचं नाव असून हरियाणा सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री आहेत.
महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासून नोटांवर गांधींची प्रतिमा आली आहे, तेव्हापासूनच नोटांचं अवमूल्यन झाल्याचं अनिल वीज बरळले आहेत. नोटांवरुनही गांधीजींचा फोटो हटवायला हवा. लवकरच गांधीजी नोटांवरुनही गायब होतील, असं विधान अनिल विज यांनी केलं आहे. खादी ग्रामोद्योगाचं कॅलेंडर आणि डायरीवरुन गांधींऐवजी मोदींचं छायाचित्र प्रसिद्ध झालं आहे, तेव्हापासून हा वाद चर्चेत आहे. खादी ग्रामोद्योगाला महात्मा गांधी यांच्या नावामुळेच उतरती कळा लागल्याच अनिल विज म्हणाले.