Breaking News

कोंडवे गाव स्मार्ट बनणार : खा. उदयनराजे

सातारा, दि. 16 - आदर्श सांसद ग्राम योजनेंतर्गत कोंडव्यात कोट्यवधींची विकासकामे झाली असून उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.  उर्वरित विकासकामांचा धडाका सुरु असून कोंडवे गाव लवकरच स्मार्ट बनवणार आहे, असे प्रतिपादन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
कोंडवे,  ता. सातारा येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या शुभारंभप्रसंगी खा. उदयनराजे भोसले बोलत होते. खा. उदयनराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून राष्ट्रीय  ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत 24 बाय 7 ही 2 कोटी 45  लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर असून नुकताच त्याचा शुभारंभ खा. उदयनराजे भोसले यांच्या  हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
 याप्रसंगी जि. प. सदस्य संदीप शिंदे म्हणाले, सांसद ग्राम योजनेंतर्गत कामे  मार्गी  लागल्याने आगामी काळात  गाव सुंदर व विकसित दिसणार आहे. पेयजल  योजनेमुळे गावास 24 तास मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.
 बाळासाहेब चोरगे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी उपसभापती संजय पाटील, सादिक शेख, राहुल गुजर, अधिकराव निंबाळकर, लक्ष्मण गाडे, अंकुश बोडके,  संदीप निंबाळकर, भिवराम गाडे, अंकुश चोरगे, तुकाराम निंबाळकर, मधुकर गाडे, सतीश मुळीक, बाळासाहेब ननावरे, चंद्रकांत निंबाळकर, अधिकराव निंबाळकर,  प्रितम चोरगे, जयवंत पवार, सुभाष चोरगे, दीपक भुजबळ, राजेंद्र चोरगे, बाबुराव गाडे उपस्थित होते.