Breaking News

एक लाख वीस हजाराची गांजाची झाडे पकडली

नांदेड, दि. 16 - मुदखेड जवळ एका शेतात केलेली गांजाची लागवड स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे.या गांजांच्या झाडांची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे. या गांजाच्या झाडाची संख्या 55 आहे आणि वजन जवळपास 25 किलो आहे.स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांना आज 15 जानेवारी 2017 रोजी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मुदखेड जवळ वसंतनगर तांडाच्या पूर्वेस असलेल्या उमेश कन्हैयालाल शर्माच्या शेतात गांजा या अमली पदार्थाची लागवड केली आहे.तेव्हा पोलीस अधीक्षक संजय येनपुरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अनिलगायकवाड यांना माहिती देऊन त्यांच्या कडून सूचना घेऊन विनोद दिघोरे आणि पोलीस कर्मचारी सदाशिव आव्हाड,राजू पांगरीकर,मुळके आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी मुदखेड गाठले.तेथे शेत गट क्रमांक 536 मध्ये तपासणी केली तेव्हा तेथे 50 गांजाची झाडे लावलेली होती.सोबतच पोलिसांनी गांजाची लागवडकरणारा उमेश शर्मा (40) यास सुद्धा ताब्यात घेतले आहे.अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील सर्व सोपस्कार पूर्ण करून या 50 गांजांच्या झाडांची लागवड करून अंमली पदार्थ लागवड करण्यास बंदी असतांना उमेश शर्मा यांनी ही लागवड केली आहे.अशी तक्रार विनोद दिघोरी यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.या गांजांच्या झाडांचे वय अंदाजे 8 महिने असावेत.या बाबत उमेश शर्मा विरुद्ध अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिही पर्यंत  सुरु होती.