उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस आणि अखिलेश यादवांमध्ये युती
नवी दिल्ली, दि. 06 - उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी तेथील राजकीय उलथापालथी अजूनही थांबलेल्या नाहीत. आता मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसमध्ये यूपी निवडणुकांसाठी युती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राहुल गांधी परदेश दौर्यावरुन परतल्यानंतर याबाबतची औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
या युतीनंतर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला तब्बल 100 जागा मिळू शकतात. दरम्यान, अखिलेश यादव यांनी याआधीच 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. इतर जागांबाबत युतीनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे. अखिलेश यादव यांनी ज्या 235 जागांची घोषणा केली होती त्यातील फक्त 2 दोन जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला होता. पण आता ते दोन्ही आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेला समाजवादी पक्षातला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे अखिलेश यादव यांच्या या नव्या चालीनं उत्तरप्रदेशमधील राजकारण आता नेमकं कोणत्या दिशेनं जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.