निवडणुकांपर्यंत बजेट मांडू देऊ नका, शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी
मुंबई, दि. 05 - पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाऊ नये, त्यामुळे लोकांना आश्वासनांची भूल पडू शकते, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेना यासंदर्भात राष्ट्रपतींचीही भेट घेणार आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं.
‘राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प फेब्रुवारीत मांडण्यापासून केंद्र सरकारला रोखावे. पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट फेब्रुवारीत मांडण्याचा डाव आहे. मात्र त्यामुळे जनतेला आश्वासनांची भूल पाडण्यात मोदी यशस्वी होतील. त्यामुळे शिवसेना खासदारांनी राष्ट्रपतींना अर्थसंकल्प निवडणुकांपूर्वी सादर होऊ न देण्याची मागणी करावी’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.