Breaking News

’स्मार्ट गर्ल ’कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचा समारोप

। प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप 

अहमदनगर, दि. 20 - भारतीय जैन संघटनेच्या ’स्मार्ट गर्ल ’या कार्यक्रमाद्वारे इयता आठवी ते दहावीच्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक म्हणून  निवडलेल्या शिक्षिकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप आज झाला. महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील ’स्मार्ट गर्ल ’या पथदश्री कार्यक्रमासाठी नगर  जिल्ह्याची महाराष्ट्र शासनान निवड केली आहे.भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा याच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रशिक्षणाची  अंमलबजावणी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, एक लाख तीन हजार मुलींना या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील एका शिक्षिकेस प्रशिक्षित केले जाणार आहे,यासाठी कर्जत तालुक्यात दोन दिवशीय कार्यशाळा कर्जत, मिरजगाव राशीन या  ठिकाणी संपन्न झाल्या. कर्जत येथे सोनमाळी कन्या विद्या मंदिर येथे मंदा धगाटे ढेरे यांनी, मिरजगाव येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लता नेटके यांनी तर  राशीन येथील जगदंबा विद्यालयात शोभा शेटे या प्रवीण प्रशिक्षिकांनी या कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांना निरीक्षक म्हणून भारतीय जैन संघटनेचे व्यवस्थापक  नंदकिशोर लोंढे व मुख्य प्रशिक्षक रत्नाकर महाजन यांनी भेट देऊन माहिती घेतली. या वेळी संघटनेच्या कार्यासह या प्रशिक्षणाची पार्श्‍वभूमी मा. जिल्हाध्यक्ष  आशिष बोरा यांनी विषद केली. स्मार्ट गर्लचे तालुका समन्वयक प्रसाद शहा यांनी आपण हे काम यशस्वी कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली. समारोपास भारतीय  जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, तालुकाध्यक्ष अभय बोरा, प्रीतम शहा, समीर दोषी, राकेश भंडारी, पप्पू,कोठारी, प्रीतेश कटारिया, कुमार नहार, दीपक  कोठारी, नीलेश मुनोत आदी उपस्थित होते.