न्यायासाठी अपंगाचे आमरण उपोषण
बुलडाणा, दि. 19 - एस.टी.बस मधून प्रवास करीत असतांना अपंग व्यक्तीला रस्त्यात उतरुन देण्याची धमकी देत पुर्ण टिकीट काढावयास लावणार्या एस.टी.टिकीट चेकर भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांच्यावर कारवाई करावी यासाठी आज दि.18 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
स.दानिस स.आमीन रा.गवळी पुरा वा.नं.4 बुलडाणा 100 टक्के अपंग आहे. 27 डिसेंबर रोजी खामगांव-बुलडाणा प्रवास करीत असतांना टिकीट चेकर भास्कर वाघ व प्रमोद सनगाळे यांनी काहीएक चैकेशी न करता आपल्या पदाचा गैरवापर करुन संबंधीत अपंगाला बसच्या खाली उतरुन देण्याची धमकी देवून पुर्ण भाडे वसूल केले. याही नंतर 100 टक्के अपंग असतांना एस.टी.पास अपंगत्वाचे प्रमाणपत्र व तु स्वतः खोटा आहे. तुझ्यावर पोलीस मध्ये 420 ची केस करतो अशा प्रकारे अपंगत्वावर बोलून शारिरीक, मानसिक, आर्थीक हेळसांड केली. तरी संबंधीत अधिकार्यावर अपंग कायद्या नुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन त्वरीत निलंबनाची कार्यवाही न केल्यास मी अन्नाबरोबर पाण्याचा सुध्दा त्याग करुन मरेपर्यंत उपोषण करणार असल्याचे स.दानिस स.आमीन यांनी प्रसिध्दीस दिले आहे. याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.