Breaking News

विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाचे थाटात उदघाटन....

बुलडाणा, दि. 19 - विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळेत सन2016- 17 या सत्राच्या क्रीडा सप्ताहाचे उदघाटन उपशिक्षणाधिकारी प्राथमिक अनिल अकाळ  यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन इंगळे होते तर शाळेच्या मंत्रीमडळातील क्रीडामंत्री पुर्वा  बारोटे व मुख्यमंत्री समृध्दी वनारे ह्या क्रीडापिठावर उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी  खेळाचे अनन्य साधारण महत्व आहे. लहान वयातच खेळाची आवड निर्माण झाली कि ती आवड पुढील  आयुष्यासाठी नविन दिशा देणारी ठरु शकते. म्हणुन विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटावा असे विचार उदघाटन प्रसंगी अनिल अकाळ  यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापक गजानन इंगळे यांनी शाळेतील विविध उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळले पाहिजे यासाठी शाळेतील शिक्षक आवर्जुन लक्ष देतात  व  विद्यार्थ्यामधे असलेल्या खेळाचे कौशल्य हेरुन त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला संस्थेचे संस्थापक दिवाकरभैय्या आगाशे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. क्रीडामंत्री पुर्वा बारटे हिच्या नेतृत्वाखाली  आणलेल्या क्रीडा ज्योतीचे मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन करण्यात आले. शशिकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  सुत्रसंचालन दादाराव जाधव यांनी तर आभार प्रदर्शन वैशाली गावंदे यांनी केले. क्रीडासप्ताहाचे यशस्वीतेसाठी मंत्रीमंडळ प्रमुख सौ किरण इंगळे, दादाराव जाधव,  शशिकांत पवार, सौ सुनिता इंगळे, सौ राजश्री अपार, अतुल तायडे, स्वाती सुसर, शितल साखरे, प्रणाली राठोड, सुषमा राठोड यांनी पुढाकार घेतला आहे.