Breaking News

मानखुर्दमधील झोपडपट्टीची आग आटोक्यात, दोन जण जखमी

मुंबई, दि. 13 - मानखुर्दमधील मंडाला परिसरातील झोपडपट्टीला लागलेली आग12 तासांनंतर आटोक्यात आली आहे. आज सकाळी सातच्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राजू यादव आणि अजू पाल अशी जखमींची नावे आहेत.
काल संध्याकाळी ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 27 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंडाला विभागातील कुर्ला स्क्रॅप असोसिएशनमध्ये तेलाचे गोदाम असून या गोदामाला सुरुवातीला आग लागली होती. त्यानंतर ही आग बाजूला असलेल्या रद्दीच्या गोदामात पसरली.