Breaking News

जिल्हा परिषद विभागीय स्पर्धेचे यजमानपद बुलडाणा जिल्ह्याला

मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांचा पुढाकार

बुलडाणा, दि. 29 - जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय स्पर्धाचे यजमानपद बुलडाणा जिल्हा परिषदेस मिळाले असून कित्येक वर्षांनंतर  मिळालेला हा बहूमान सर्व कर्मचारी वर्गाचा आहे. या स्पर्धांच्या  यशस्वी आयोजनाने बुलडाणा जिल्हा परिषदेची मान उंचावणार असल्याचा विश्‍वास मुख्य कार्यकारी  अधिकारी दिपा मुधोळ यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या  अमरावती विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 11 ते 13 फेब्रुवारी 2017 या कालावधीत बुलडाणा  येथे करण्यात आले आहे.  यापार्श्‍वभूमीवर गुरूवार, दि. 26 जोनवारी रोजी जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात सर्व अधिकारी कर्मचारी व खेळाडू यांची  संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ , अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बाप्पासाहेब नेमाणे , सामाण्य  प्रशासन विभागाचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे , पंचायत विभागाचे उप. मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एस.राजपूत , जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. शिवाजीराव पवार , वरीष्ठ लेखाधिकारी सचिन ईगे , कृषी विकास अधिकारी रमेश भराड , समाज कल्याण  अधिकारी मनोज मेरत , पशुसंवर्धन अधिकारी डॉ.  सुनिल पसरटे , उपशिक्षणाधिकारी सिध्देश्‍वर काळूसे, सर्व गटशिक्षणाधिकारी , कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी  व विविध खेळातील जिल्हा स्तरावरील विजयी -  उपविजयी पुरूष व महिला खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना दिपा मुधोळ म्हणाल्या की, कर्मचा-यांमध्ये सकारात्मकता , प्रेरणा व उत्साह निर्माण करण्यासाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव  उपयुक्त ठरतात. हे लक्षात घेऊन यापूर्वी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगानेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये व पर्यायाने  कर्मचा-यांमध्ये समन्वय व सुसंवाद घडून यावा या उददेशाने विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सव बुलडाणा येथे आयोजीत करण्यात यावा, अशी आपली  दृढ इच्छा होती.  या संदर्भात विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेत आपली मागणी  विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी मान्य केल्याचे सांगून हा बहूमान बुलडाणा  जिल्हयाला मिळाला असल्याची माहिती दिपा मुधोळ यांनी या बैठकीत दिली . तथापी या स्पर्धांसोबतच प्रशासकीय  कार्यांच्या माध्यमातून सुध्दा अमरावती  विभागात बुलडाणा जिल्हा परिषदेची मान उंचावेल यासाठी आपण सर्वांनी संघटीत व समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या  कित्येक  वर्षानंतर बुलडाणा जिल्हाला मिळालेला हा बहुमान विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून आम्हाला पुर्ण करायचा आहे . त्यामुळे  या मध्ये जिल्हा परिषदच्या सर्व यंत्रणांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवणे  आवश्यक असल्याचे नमूद करून दिपा मुधोळ म्हणाल्या कि या माध्यमातून अमरावती  विभागात बुलडाणा जिल्हा परिषदेचा  नाव लौकिक अधोरेखीत होईल . मात्र त्यासाठी स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व कर्मचारी खेळांडूनी खेलाडू वृत्ती , सहकार्य व  शिस्त याचा आदर्श सुध्दा निर्माण करावा , अशी अपेक्षा सुध्दा  मुधोळ यांनी व्यक्त केली .
बुलडाणा जिल्हा परिषदे अंतर्गत कर्मचा-यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा या वर्षी आयोजीत करण्यात आल्या होत्या . मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा  मुधोळ यांच्या पुढाकाराने आयोजीत हया स्पर्धा व सांस्कृतीक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्या. विशेष उल्लेखनीय असे कि दिपा मुधोळ यांनी स्वतः बॅडमिंटन या  खेळात सहभाग घेतला होता. सोबतच सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये सुध्दा त्यांनी व्यक्तीगत गीतगायन  करून कर्मचा-यांना प्रोत्साहन दिले होते.
या पार्श्‍वभुमीवर जिल्हा परिषदेच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतीक  महोत्सवाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित या बैठकीत विविध मुदयांवर  सर्वंकष चर्चा करण्यात आली . बैठकीचे  प्रास्तविक उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले.  सुत्र संचलन विजय तांदूळकर यांनी तर  आभार  प्रदर्शन कास्ट्राईब संघटनेचे प्रशांत बोर्डे यांनी केले.