Breaking News

जि.प. व पं.स.निवडणूकांसदर्भात भाजपाची आढावा बैठकीत रा.काँ.च्या दिग्गजांचा पक्षप्रवेश

बुलडाणा, दि. 29 - भारतीय जनता पार्टी मेहकर तालुका मतदार संघाचे वतीने आज मा.कृषी मंत्री म.रा.भाऊसाहेब फुंडकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय  कोठारी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन शर्मा, जिल्हा सरचिटणीस या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पदविधर मतदार संघ निवडणूक तसेच जि.प.व  पं.स.निवडणुकीची आढावा बैठक घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना.भाऊसाहेब फुंडकर होते. तर जिल्हा अध्यक्ष धृपतराव सावळे, सचिनबापू  देशमुख हे प्रमुख उपस्थितीत होते. पदविधर मतदार संघाचे उमेदवार डॉ.रणजीत पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प या प्रसंगी मांडण्यात आला. तर  तालुक्याची पदवीधर मतदारांविषयी सविस्तर मांडणी किरण जोशी, राजेश निकम व तालुका अध्यक्ष शिव पाटील यांनी मांडली. या प्रसंगी मेहकर तालुक्यातील  बर्‍याच मान्यवरांचा भाजपा मध्ये प्रवेश झाला. यामध्ये मेहकर न.पा.माजी नगराध्यक्ष अशोक अडेळकर तसेच आकाश घोडे हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी  करुन भाजपा मध्ये प्रवेश केला तर डोणगांव येथील गणेश पळसकर, गजानन काळदाते, विलास परमाळे व अन्य 60 कार्यकर्त्यांनी मा.कृषीमंत्री भाऊसाहेब  फुंडकर यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये प्रवेश घेतला प्रवेशा नंतर विजयी कोठारी तसेच मोहन शर्मा यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ना.भाऊसाहेब फुंडकर, आ.संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागून येणार्‍या निवडणूकांमध्ये कमळ फुलविण्याचे आवाहन केले.  तसेच शहरातील भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.डि.एफ.माळ यांनी केले तर आभार सिताराम महाराज ठोकळ यांनी मानले. कार्यक्रमाला मेहकर परिसरातून, ग्रामीण भागातून  मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.