औंध येथे राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेस प्रारंभ
औंध, दि. 19 (प्रतिनिधी) : ब्रह्मलीन हिरापुरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त औंध (ता. खटाव) येथे राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेस उत्साहात सुरुवात झाली. टाळ, वीणा, तबला, मृदंगाचा गजर, संगीत भजनांचा सूर आणि संगीत भजन स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भजन संघ, संगीतप्रेमींच्या उपस्थितीमुळे अवघे वातावरण भारावले होते.
प्रारंभी पुसेगावच्या श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चाराच्या जयघोषात मठाधिपती श्यामपुरी महाराज यांच्या हस्ते हिरापुरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हिरापुरी महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पांजली वाहण्यात आली. यानंतर आ. मोहनराव कदम, बाजार समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर जाधव, रमेश चव्हाण आदींच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व विविध संगीत साहित्याचे पूजन करण्यात आले.
यावेळी महेशगिरी महाराज (सिंधी भांडवली), अखिलेशगिरी महाराज (रहिमतपूर), सत्यानंद महाराज, बजरंगगिरी महाराज (किन्हई), रामगिरी महाराज (चिंचणी), कमलगिरी महाराज, मुकुंदगिरी महाराज, नवरत्नगिरी महाराज, धर्मेंद्रगिरी महाराज, हणमंत महाराज (अंबवडे) आदी साधू संत महंतांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील सावंत यांनी सूत्रसंचालन केले. बबनराव पाटणकर यांनी आभार मानले. यावेळी जगन्नाथ मोहिते, रावसाहेब कर्णे, गणेश बुटे, वसंतराव देशमुख, वाघ, ज्ञानेश्वर फडतरे आदी मान्यवर तसेच विविध जिल्ह्यातील संगीत भजनी मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होती.