सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद देऊ - सुलभा उबाळे
पुणे, दि. 06 - पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद नाही दिले तरी चालेल पण येत्या निवडणुकीत आम्ही सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीला विरोधीपक्ष नेतेपद देऊ, असा टोला शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे यांनी लगावला.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कलाटे, माजी शहर प्रमुख भगवान वाल्हेकर, नगरसेविका विमल जगताप, शारदा बाबर, नगरसेवक धनंजय आल्हाट, संपत पवार, राम पात्रे, युवासेनेचे अध्यक्ष अमित गावडे, रामी सिंधू, आदी शिवसैनिक उपस्थित होते.
काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून त्यांचे संख्याबळ कमी झाल्यामुळे हे पद शिवसेनेला द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सत्ताधारी पक्षातर्फे टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत शिवेसेनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी बोलताना उबाळे म्हणाल्या की, शिवसेनेचे 15 नगरसेवक होते तर काँग्रेसचे केवळ 14 तरी यांनी शिवसेनेला डावलून काँग्रेसला विरोधी पक्ष बनवले. यांना विरोधक नको ताटा खालचे मांजर हवे आहे. त्यामुळेच त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधीत कधी कडाडून विरोध केला नाही.
आता तर काँग्रेसचे केवळ 5 नगरसेवक राहिले आहेत, असे असताना देखील, आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे हे कारस्थान आहे. आम्हालाही नको आता विरोधी पक्ष पद, मात्र पुढच्या निवडणुकीत सत्तेवर आल्यानंतर आम्ही यांना विरोधी पक्ष बनवू हे नक्की. त्यांना विरोधी पक्ष म्हणून जाहीर करतो, असा टोलाही उबाळे यांनी लगावला. यावेळी महापौर शकुंतला धराडे यांना निवेदनही देण्यात आले.