Breaking News

श्री स्वामी विवेकानंद गौरव पुरस्काराचे येत्या रविवारी वितरण

पुणे, दि. 06 - संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने संस्कार जत्रा, राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली. यावर्षीचा राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे यांना जाहीर झाला आहे.
चिंचवड बिजलीनगर येथील विश्‍वेस्वर ज्ञानदिप मंडळाच्यावतीने रविवार दि. 8 जानेवारीला सकाळी दहा वाजता या समारंभाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नवनगर शिक्षण संस्थेचे सचिव गोविंद दाभाडे, पांडुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे, घनशाम चिंचवडे, विजय भोसले, ललीता सबनीस, डॉ. एस.एस. चितलांगे, टाटा मोटर्सचे शिवरामकृष्णन आदी उपस्थित राहणार आहे.
सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडी निघेल. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. जीवन गौरव पुरस्काराचे वितरण डॉ. श्रीपाल सबनीस .यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय श्री. स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कारात शांताराम कारंडे, सतीश पाटील, अरुण बो-हाडे, करुणा चिंचवडे,  रवींद्र चव्हाण, दिपक शेलार, सुवर्णा शिंदे (समाजरत्न पुरस्कार), गणेश कदम, प्रशांत हंबर (संस्काररत्न), विनोद पवार (पत्रकारिता), राजेंद्र वाघ (कवीरत्न), किरण जोशी (डॉक्टरत्न), जगन्नाथ शिंदे (कृषीरत्न), प्रसन्ना पदमवार (उद्योगरत्न), बालशाहीर चैतन्य काजुळकर (कलागौरव) यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.