कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृतीसाठी एस पी कॉलेजमध्ये शनिवारी ’डिजी धन मेळावा’
पुणे, दि. 06 - रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करुन अधिकाधिक लोकांना डिजिटल अर्थप्रणालीत सहभागी करण्याच्या उद्देशाने डिजीटल प्रदान मोहिमेअंतर्गत जनजागृतीपर शनिवार दि. 7 जानेवारी 2017 रोजी येथील एस पी कॉलेजच्या प्रांगणात डीजी धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला केंद्रिय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
डीजी धन मेळाव्याचा उद्घाटन कार्यक्रम शनिवार दि. 7 जानेवारी 2017 रोजी याठिकाणी सकाळी 11 वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.लेडी रमाबाई सभागृह, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे येथे दुपारी 3 वाजता होणार्या मुख्य कार्यक्रमास केंद्रिय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी व केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या मेळाव्यात 60 स्टॉल सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील 10 ग्रामपंचायती व 10 नगरपालिकांना डिजीटल म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच लकी ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर व्यवहारात कसा करावा यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे. या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक, हस्तकला, कपडे,खाद्यपदार्थ आदी विविध वस्तूंच्या तसेच बचत गटांचे व विविध बँका, आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांच्या सेवांचा समावेश असलेल्या 60 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहेत. यासाठी रुपे कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार आधारित पेमेंट, यूपीआय,यूएसएसडी आदी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी बँकांचे नवीन खाते उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे, आधार नोंदणीतील दुरुस्ती व अद्यावतीकरण, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी आदी विविध सेवाही देण्यात येणार आहेत. यासाठी नागरिकांनी आपला आधार क्रमांक सोबत आणावा. तसेच आधार क्रमांक नोंदणी करु इच्छिणार्यांनी ओळखीचा पुरावा, वास्तव्याचा पुरावा, जन्म तारखेचा दाखला आदी पुरावे सोबत आणावेत.
ग्राहक व व्यापार्यांमध्ये कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृती व्हावी, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. सौरभ राव यांनी केले आहे. संपर्कासाठी जिल्हाधिकारी कार्यायलाच्या फेसबुक fb.me/Collectorofficepune व ट्विटर http:twitter.com/CollectorPune या लिंकवर क्लिक करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.