माऊली जमदाडे यंदाचा श्री सेवागिरी केसरी
खटाव, दि. 06 (प्रतिनिधी) : श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवानिमित्त हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत कोल्हापूरच्या माऊली जमदाडेने दिल्लीचा पैलवान भोलो याचा पोकळ घिस्सा डावावर पराभव करत श्री सेवगिरी केसरी पदावर नाव कोरले. सेना दलातील कर्नाटक केसरी कार्तिक काटे याने कोल्हापूरच्या विजय धुमाळ याला आसमान दाखवून शौकिनांची वाहवा मिळवली.
सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्याला पैलवान आणि प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मानाच्या सेवागिरी केसरी पदासाठी झालेल्या प्रेक्षणीय कुस्तीला शौकिनांनी मोठी दाद दिली. माऊली आणि भोलोने सुरुवातीला एकमेकांचा अंदाज घेतला. भोलोने आक्रमण करुन धोबीपछाड देण्याचा केलेला प्रयत्न माऊलीने चपळाईने हाणून पाडला. हाताची सांगड घालत भोलोवरील पकड मजबूत करुन माऊलीने वर्चस्व मिळवले. उत्कंठापूर्ण लढतीत अखेर माऊली जमदाडेने भोलोला पोकळ घिस्सा डावावर आस्मान दाखवत सेवागिरी केसरी पदावर कब्जा केला.
पुसेगावच्या कुस्ती मैदानात आयोजित इतर सर्वच काटा कुस्त्यांनी शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कर्नाटक केसरी कार्तिक काटेने अटीतटीच्या लढतीत घिस्सा डावावर कोल्हापूरच्या विजय धुमाळचा पराभव करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नामांकित पैलवानांच्या प्रमुख लढतीत पुण्याच्या कौतुक डफळेने मोळी डावावर पुण्याच्याच भारत मदनेवर मात केली. पुण्याच्या गोकुळ आवारे याने कोल्हापूरच्या योगेश बोंबाळे याचा एकसक डावावर पराभव केला. कोल्हापूरच्या मारुती जाधव याने समोरुन लपेट मारत पुण्याच्या पोपट घोडके याला चितपट केले. पुण्याच्या संदिप काळेने कोल्हापूरच्या महेश वरुटेला तर पुण्याच्या बापू मदने याने दिल्लीच्या अमित कुमार याला काटा लढतीत आस्मान दाखवले. इचलकरंजीच्या महादेव वाघमोडीने गदालोड डावावर पुण्याच्या शैलेश शेळके याला, सांगलीच्या संदीप हप्परकरला जखमी झाल्याने आंबेगावच्या उदय पवारकडून पराभव स्वीकारावा लागला. खुडूसच्या लखन पांढरेने कोल्हापूरच्या संतोष लाढेवर, इचलकरंजीच्या बाळू पुजारीने मुरगुडच्या सोन्या सोनटक्केवर प्रेक्षणीय कुस्तीत मात केली. कृष्णात जाधव, सुभाष माने, विजय जाधव, हमणंतराव गायकवाड, विकास जाधव, श्रीमंत जाधव, सुरेश शिंदे, नितीन राजगे, राजेंद्र कणसे, मधुकर शिंदे, अधिक जाधव, तानाजी मांडवे, साहेबराव शिकलगार, अंकुश पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
श्री सेवागिरी केसरी कुस्ती मैदानाचे उद्घाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, प्रताप जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, सुरेशशेठ जाधव, कृष्णात जाधव, विजय जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.