विकासात्मक कामात हयगय करणार्यांवर कारवाई : सहपालकमंत्री
सातारा, दि. 06 (प्रतिनिधी) : सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण सर्वांनी मिळून काम करु या. तुमच्या काही अडचणी असतील, त्याही समजून घेतल्या जातील. मात्र, विकास कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करु नका, त्यामध्ये हयगय दिसल्यास कठोर कारवाई करु, असा इशारा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.
जिल्हा नियोजन अंतर्गत योजनांच्या प्रगतीचा आढावा सहपालकमंत्री खोत यांनी येथील नियोजन भवनात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जी. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त हर्षवर्धन डोंगरे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख यांनी सहपालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी संगणकीय सादरीकरण केले.
सहपालकमंत्री खोत म्हणाले, आपणा सर्वांची ओळख व्हावी, जिल्ह्यात काय काम चालले आहे याची माहिती घेण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. पालकमंत्री विजय शिवतारे आणि मी संयुक्तपणे जिल्ह्याच्या विकासासाठी काम करु आणि आपणा सर्वांनाही तोच दृष्टीकोन ठेवून काम करावयाचे आहे. मत्स्य विभागाने मच्छी व्यवसायाला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. खास करुन बंदीस्त मत्स्य पालन याचा अहवाल तयार करावा. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी जिल्हा उपनिबंधक विभागाने अतिरिक्त निधीची मागणी करावी. गावनिहाय पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा घेवून अहवाल सादर करावा. या योजनेमध्ये भरपूर तक्रारी होत आहेत. त्याचाही फेर आढावा घ्यावा. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे याबाबत स्वतंत्र बैठक लवकरच घेतली जाईल. विज वितरण कंपनीने शेतकर्यांची प्रलंबीत प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावीत. जिल्हा क्रीडा विभागाने व्यायाम शाळा आणि साहित्य यांना प्राधान्य द्यावे, खास करुन कुस्तीसाठी जी गावे पुढे येत आहेत, ज्या गावात कुस्तीची परंपरा आहे, अशा ठिकाणी मॅट देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतील निधीची मागणी करावी. जिल्ह्यातील धोकादायक शाळांचा आढावा घेवून धोकादायक शाळांच्या दुरुस्तीच्या कामास प्राधान्य द्यावे. शेळीपालन, कुकुटपालनास प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. आरोग्य विभागाने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करावे. महसूल विभागाने वारस नोंदणी आणि शिधापत्रिका यादीवाचन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावा. सर्वसामान्य जनतेला हे शासन आपले आहे असे वाटले पाहिजे. जलयुक्त शिवार अभियान प्रभाविपणे आपणा सर्वांना राबवायचे आहे, यासाठी मी बंधार्यांना भेटी देणार आहे. रस्ते, वसतीगृहातील जेवण, बंधारे, वनतळी आदींबाबत कोणतीच हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी कडक धोरण ठेवा. उत्तम दर्जा निर्माण करा, अशा सूचना सहपालकमंत्री खोत यांनी दिल्या. नियोजन अधिकारी जगदाळे यांनी आभार मानले. बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.