अवैध वाळू उपसावर कारवाई; जेसीबीसह 3 ट्रॅक्टरवर कारवाई
सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील वेणेगाव येथे वेण्णा-उरमोडी नदी संगमात मोडा नावाच्या शिवारात बेकायदा वाळूसाठ्यावर सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर, जेसीबी जप्त करण्यात आले असून तिघांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वेणेगावात वाळूचा बेकायदा उपसा सुरु असल्याची माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांना समजल्यावर त्यांनी कारवाईसंदर्भात कल्पना न देता महसूल अधिकारी तसेच कर्मचार्यांची टीम सोबत घेऊन धडक कारवाई केली. यावेळी वेणेगावातील सदाशिव गोपाळ शिवणकर यांच्या मालकीच्या क्षेत्रात नदीपात्रातून उपसा केलेल्या वाळूचा साठा केला जात असल्याचे अधिकार्यांना आढळले. नदीपात्रातून काढून ठेवलेली 1 ब्रास वाळू जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरताना तिघेजण आढळले. त्यांच्याकडे गौण खनिज परवान्याबाबत विचारले असता हा प्रकार बेकायदेशीर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी तलाठी कैलास भोसले यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रॅक्टर चालक मनोज श्रीकांत जाधव (रा. भाटमरळी, ता. सातारा), ट्रॅक्टर चालक सयाजी नानू सावंत (रा. वेणेगाव) तसेच जेसीबी ऑपरेटर हरीष शहाजी काळे (रा. इंदोली, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून ट्रॉलीसह 2 ट्रॅक्टर (एमएक्सआय 8015) तसेच जेसीबी (एमएच 11 बीए 1786) जप्त करण्यात आले. मात्र चालक जाधव यांच्या ट्रॅक्टरचे पासिंग झालेले नाही. या कारवाईत मंडलाधिकारी एस. बी. पिसाळ, तलाठी टी. बी. कोळेकर, एस. जे. सपकाळ, ए. के. देशमुख, व्ही. पी. पाटील, यांनी सहभाग घेतला. पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे अधिक तपास करत आहेत.