Breaking News

म्हैसाळचे बारा पंप सुरु, शेतकर्‍यांना दिलासा

सांगली, दि. 19 - म्हैसाळ योजनेचे बारा पंप मंगळवारी सुरु करण्यात आले. म्हैसाळचे पाणी तिसर्‍या टप्प्यापर्यंत पोहोचले असून, बुधवारी तिसर्‍या टप्प्यातील  पंप सुरु करण्यात आले. टंचाई निधीतून चार कोटी रुपये उपलब्ध झाल्याने म्हैसाळ योजना सुरु झाली असून, पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद मिळाल्यास दीड महिना  आवर्तन सुरु राहणार आहे.
द्राक्षे व ऊस पिकासाठी म्हैसाळचे आवर्तन सुरु करण्याची शेतकर्‍यांची मागणी होती. मात्र गतवर्षी दोन टप्प्यात तब्बल 160 दिवस आवर्तन सुरु असल्याने सुमारे  25 कोटी वीजबिल थकीत आहे.
गतवर्षीच्या थकीत वीज बिलापोटी चार कोटी रुपये टंचाई निधीतून महावितरणला देण्यात येणार असल्याने महावितरणने म्हैसाळचा खंडित वीजपुरवठा जोडला  आहे. म्हैसाळ टप्पा एकमधील सकाळी म्हैसाळ टप्पा एकमधील दोन पंप सुरु करण्यात आले. सायंकाळपर्यंत दोन टप्प्यातील बारा पंप सुरु करण्यात आले असून  बेडग हुर्लेेगिरी फाटा येथील तिसर्‍या टप्प्यापर्यंत पंप सुरु करण्यात येणार असून प्रति सेकंद एक हजार क्युसेक पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. म्हैसाळच्या  चार टप्प्यातील एकूण 60 पंप सुरु करण्यात येणार आहेत. म्हैसाळचे आवर्तन सुरु झाल्याने मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला  आहे. मात्र योजनेची थकबाकी मोठी असल्याने गावनिहाय पाणीपट्टी वसुलीची मोहीम सुरु करण्यात येणार आहे. दरमहा वीज बिलाची थकबाकी भरावी लागणार  असल्याने पाणीपट्टी वसुलीवरच आवर्तन सुरु राहणार आहे. वारण ा व कोयना धरणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने डिसेंबरमध्येच म्हैसाळचे आवर्तन सुुरु  करण्याचे नियोजन होते. मात्र थकबाकी वसुली व पाण्याची मागणी नोंदविण्यास शेतकर्‍यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने आवर्तन रखडले होते. म्हैसाळचे आवर्तन  सुरु करण्यासाठी लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांची बैठक घेऊन, शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र कारखान्यांनीही  पाणीपट्टी भरण्यास प्रतिसाद दिला नसल्याने टंचाई निधीतून भरण्यात येणार्‍या वीज बिलावर म्हैसाळचे पंप सुरु झाले आहेत.
पुजारी यांच्या दारात लावलेल्या स्कॉर्पिओ या कारवर बिअरच्या बाटल्या फेकूल मारल्या. बाटल्या मारल्याचा आवाज आल्याने अरुण पुजारी व त्यांचा भाऊ सागर  यांनी बाहेर येऊन पाहीले असता, दुचाकीवरुन दोन इयम पळून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दुसर्‍या दुचाकीवरुन दोघांचा पाठलाग केला व अरुण  हाताळगी यास घरी घेऊन गेले. त्याच्याकडे चौकशी केली असता पोलिस संतोष पाटील याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे त्यांने सांगितले, तसेच  तीन  महिन्यापूर्वी कार सुध्दा आम्हीच पेटविल्याचे सांगितले. या दरम्यान एका कारमधून सचिन डोंगरे व संतोष पाटील हे आले. व पुजारी याला पाहून सांगलीच्या दिशेने  गेल्याने पुजारी यांनी त्याचे मित्र सुहास बंडगर, रोहीत पाटील यांना बरोबर घेत हाताळगी याच्या दुचाकीवरुन त्या कारचा पाठलाग केला. अंकली पुलापासून गाडी  सांगलीच्या बाजूने आल्याने त्यांनी पुन्हा उदगावकडे जाण्यास दुचाकी वळवली.
पुजारी मित्रांच्याबरोबर दुचाकीवरुन उदगाव जवळील जोग फार्म हाऊस जवळ आले असता, पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली.  यामध्ये पुजारी याच्यासह त्याचे दोन मित्र रोहीत व सुहास हे जमिनीवर पडले. त्यांच्या हात व पायाला खरचटले. याच वेळी दुसर्‍या कारमधून संतोष पाटील,  स्वप्नील कोलप, महेयश नाईक यांच्यासह अनोळखी चार ते पाच जण तिथे आले. यापैकी सचिन डोंगरे याने हॉकी स्टिकने अरुण पुजारी याच्या पाठीत मारले.  तर संतोष पाटील याने रोहीत याच्या नमगटावर चाकू मारुन जखमी केले. पुजारी याचा भाऊ सागर व वडील राजाराम यांनाही स्वप्नील कोलप, महेश नाईक  यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत दोन्ही गटातील आठरा जणांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास सांगली गङ्घामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश गायकवाड व जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सत्यराज घुले करीत आहेत.