सांगलीत पोलिसांच्या दोन गटात मारामारी
सांगली, दि. 19 - सांगली शहर पोलिस ठाण्यांकडे कार्यरत असलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबल मधील धुमसत असलेल्या वादाचे सोमवारी रात्री साडे आकरा हाणामारीत रुपांतर झाले. पूर्व वैमनस्य व कार पेटविल्याच्या कारणांवरून संतोष पाटील व किरण पुजारी या दोन पोलिसांच्या समर्थकांच्यामध्ये अंकली रोड व उदगाव मध्ये तुफान राडा झाला. तलवार, चाकू, हॉकी स्टिकचा वापर करण्यात आला. यामध्ये दोन्ही गटाचे चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांत जखमी अरुण आनंदराव हातागळे (वय 25 रा. 80 फूटी रोड, विश्रामबाग) तर जयसिंगपूर पोलिस ठाण्यात अरुण पुजारी याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या आकरा जणांना अटक केली असून तब्बल आठरा ते वीस जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी किरण राजाराम पुजारी (वय 28 रा. धनगर गल्ली, उदगाव, ता. शिरोळ), राजाराम बाळू पुजारी (वय 53 रा. धनगरगङ्घी, उदगाव), रोहीत सतीश पाटील (वय 19 रा. उत्तर शिवाजीनगर, सांगली), ओंकार पोपटराव मगदूम (वय 19 रा. गावभाग, सांगली), ओंकार दिलीप माने (वय 23 रा. पटवर्धन हायस्कूलजवळ,राजवाडा, सांगली) व सुरेश उर्फ दादू सोमनाथ बंडगर (वय 26 रा. बुधगाव, ता. मिरज) यस पुजारी समर्थकांसह संतोष पाटील, सचिन डोंगरे, अरुण हामतळगी, दत्ता (पूर्ण नाव नाही), स्वप्नील उर्फ गोट्या कोलप, महेश नाईक या पाटील समर्थकांना सांगली गङ्घामीण व जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अरुण हातागळे, दत्तात्रय झांबरे हे पाटील समर्थक व किरण पुजारी याच्यासह अन्य दोन जण या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील वसंतदादा पाटील शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत अधिक माहीती अशी, तीन महिन्यापूर्वी किरण पुजारी याची स्कॉर्पिओ कार कोणीतरी जाळली होती. ती कार कॉन्स्टेबल संतोष पाटील याच्यासी काही जणांनी जाळल्याचा त्याला संशय होता. यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. चार दिवसांपूर्वी तो वाद पुन्हा उफाळून आला होता. याचा राग किरण पुजारी याच्या मनामध्ये खदखदत होता. यावरुन सोमवारी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास अंकली फाटा येथे संतोष पाटील व किरण पुजारी यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून किरण पुजारी याच्यासह त्याचा भाऊ सागर पुजारी, वडील राजाराम पुजारी सह अन्य पाच ते सहा जणांनी अरुण हातागळे याच्यावर तलवारीने हङ्घा करुन जखमी केले. तर हातागळे यांचे मित्र दत्तात्रय झांबरे यांना लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
तर जखमी किरण पुजारी याने जयसिंगपूर पोलिस ठाण्यात संतोष पाटील, सचिन डोंगरे, अरुण हामतळगी, दत्ता (पूर्ण नाव नाही), स्वप्नील उर्फ गोट्या कोलप, महेश नाईक यांच्यासह अन्य चार ते पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तीन महिन्यापूर्वी संतोष पाटील, सचिन डोंगरे, अरुण हाताळगी, दत्ता यांच्यासह काही जणांनी पुजारी यांची कार जाळल्याचा त्यांचा संशय होता. सोमवारी रात्री उदगाव येथील पुजारी यांच्या घरासमोर अरुण हाताळगी, दत्ता (पूर्ण नाव नाही) हे दुचाकीवरुन आले.