Breaking News

नाशिकचे धावपटू किसन तडवी, संजीवनी जाधवला सुवर्ण पदक

नाशिक, दि. 13 -  कोईम्बतुर येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी अ‍ॅथलिट चॅम्पीयनशिपमध्ये नाशिकच्या किसन तडवी आणि  संजीवनी जाधव यांनी सुवर्णपदक मिळवतांना विक्रमी वेळ नोंदवत विश्‍वविक्रम केला.
किसन तडवी याने धावण्याच्या 5 हजार मीटर शर्यतीत 14.37.47 ही वेळ नोंदवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर सुरवातीला सर्व स्पर्धकांच्या तब्बल 60  मीटर मागे असेलेल्या संजीवनी जाधव हिने 5 हजार मिटर धावण्याच्या स्पर्धेत 15.59.17 ही वेळ नोंदवत सुवर्ण पदक मिळवले. या दोन्ही खेळाडूंना महिंद्रा  कंपनीने प्रायोजकत्व दिले असून त्यांना प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी मार्गदर्शन केले.