Breaking News

महात्मा गांधी यांचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही - कलराज मिश्र

नवी दिल्ली, दि. 13 - महात्मा गांधी संपूर्ण देशासाठी पूजनीय असून त्यांचे स्थान कोणीच घेऊ शकत नाही, असे केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री  कलराज मिश्र यांनी म्हटले आहे.
खादी ग्रामोद्योग आयोगाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिका व डायरीवर महात्मा गांधीच्या ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला स्थान  देण्यात आल्याबाबतची अधिक माहिती मी त्वरीत घेणार आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास या निर्णयातल्या त्रुटी दूर करेन, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी खादीला जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यामुळे खादी उद्योगासाठी मोदींची वेगळे महत्त्व आहे. मात्र महात्मा गांधी यांचे स्थान सर्वोच्च  असल्याचेही ते म्हणाले.