Breaking News

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना चिखली कॉगे्रसकडून मानवंदना

बुलडाणा, दि. 13 - प्रचंड आराजगताच्या स्थितीत मुर्तीमंत शिवराज्य उभे करून बहुजनात विश्‍वासार्हता निर्माण करणार्‍या राजमाता जिजाउ व जगाला हिंदुत्वाचा  परिचय दोनच शब्दात करून देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज दिनांक 12 जानेवारी 2017 रोजी जनसेवा कार्यालयात चिखली तालुका  कॉगे्रसचे अध्यक्ष विष्णु पाटील कुळसुंदर व शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांचे प्रमुख उपस्थितीत या महामानवांना आंदराजंली वाहण्यात आली.
राजमाता जिजाउ मॉ साहेब यांची तिथी नुसार व तारीखे नुसार जयंती योगायोगाने एकाच दिवसी आली. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांचीही जयंती  असल्याने चिखलीतील जनसेवा कार्यालयात या दोन्ही महामानवांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनिल कासारे,  दिपक खरात, राजु रज्जाक, डॉ. इसरार, बाजार समितीचे संचालक बिदुसिंग इंगळे, माजी संचालक तेजराव गायकवाड, रामेश्‍वर भ्ाुसारी, सरपंच मुरलीधर  क्षिरसागर, जेष्ठ पत्रकार मनोहर गायकवाड, राजु सोनुने, गजानन घायाळ, यांची उपस्थिती होती.