Breaking News

कणगी बनविण्याचा व्यवसाय अडचणीत!

बुलडाणा, दि. 13 - गेल्या तिन चार वर्षापासुन महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून याचा परिणाम मोठया प्रमाणात जाणवला आहे दुष्काळाचा  फटका केवळ शेतकरीच नव्हे तर शहरी व ग्रामीण भागातील मजुर कारागिरांनाही बसला आहे. परंपरागत व्यवसाय व ग्राहकी अभावी संकटात सापडत आहे.  कोराटी व सिंधीच्या कोकापासुन काही गोर गरीब समाज कणग्या डालगे बनविण्यात तरबेज असुन गेल्या तीन चार वर्षापासुन दुष्काळ पाठ सोडत नसल्याने शेतात  लावलेला खर्चही निघत नसल्याने शाळु, ज्वारीचे, गहु व मुंग, उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कणग्यात ज्वारी गहु साठवुन ठेवण्यासाठी कणग्यांचा  वापर होत नसल्याने दिसत आहे मुंग उडीद ज्वारी काढण्यासाठी शेतकरी डालगे वापर होते मात्र गेल्या तिन चार वर्षापासुन पर्जन्यमान कमी प्रमाणात होत  असल्याने शाळु ज्वारी मुंग उडीद पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने कणग्या व्यवसायाला घरघर लागली आहे गेल्या 15 ते 20 वर्षापुर्वी साधारण  शेतकर्‍यांकडेही शाळु ज्वारी गहु साठवण्यासाठी कणगी असायची कणगीला प्रथम शेणाचा लेप लावुन वाळुन झाल्यानंतर त्याव वर्ष दोन वर्षासाठी शेदोरी म्हणुन  साठवुन ठेवायचे तर बहुसुधारक शेतकरी यांच्याकडे घराच्या बाजुला पेर असायचा त्यात चार ते पाच वर्ष ज्वारी गहु साठवुन ठेवायचे मात्र विकत नव्हते आणि  खाण्यासाठी कणग्या वर्षभराची शाळु ज्वारी गहु साठवुन ठेवायचे मात्र आता दुष्काळी परिस्थीती नसतांना या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे.  व या पेस्यमध्ये घट झाल्याने पेव नामशेष झाले आणि कणग्या व्यवसाय संकटात सापडला आहे.