Breaking News

बुलडाणा कृउबास ची आयएसओकडे वाटचाल

बुलडाणा, दि. 13 - शेतकरी हित जोपासत विकासात्मक बदलामुळे आदर्शवत ठरणार्‍या बुलडाणा कृर्षी उत्पन्न बाजार समितीची आएसओ कडे वाटचाल सुरू  झाली आहे. सुसज्य शेतकरी भवन, अंतर्गत रस्ते, व्यापारी गाळे, असो वा विमा सुरक्षा, अशा लोकभिमुख निर्णयामुळे सभापती जालिंधर बुधवत व संचालक  सहकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे आता ‘आएसओ’ नामांकन मिळण्याची दिशा स्पष्ट झाली आहे. बाजार समितीसाठी हा मौलाचा दगड ठरणार आहे.
सभापती म्हणुन जालिंधर बुधवत यांनी पदभार स्वीकारणपुर्वी पुर्णतःतोट्यात बुलडाणा कृर्षी उत्पन्न बाजार समिती होती. चिखली किंवा अन्य बाजार  समितीकडे बुलडाण्याचे विलनिकरण होईल अशी परिस्थती निर्माण झाली होती. कर्मचार्‍यांचे थकीत वेतन 11 महिन्यांवर जाऊन पोहचले होते. मालाची आवक  मंदावली होती. मात्र नाविन्यपुर्ण उपक्रमांचा आधार घेत सभापती जालिंधर बुधवत यांनी सर्व संचालक मंडळाला विश्‍वासात घेवुन एकजुटीने विकासात्मक  कायापालट घडवुन आणला. भोजनालय कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, शौच्छालय सासह पायाभुत सुविधा परीपुर्ण विकास बाजार मितीचा झाला. आता कर्मचार्‍याची  बायोमॅट्रीक प्रणालीवर हजेरी, कर्मचार्‍यांनी आनंदी वातावरण मिळावे यासाठी मुझिक थेरपी, परिसरात वॉटर फाउंन्टन यासह कृर्षीक्षेत्रात हरीतक्रांती घडविणारे  माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुतळा सुध्दा बसविण्यात येणार आहे. शिवाय कृषी मेळावे आयोजित करून कमी क्षेत्रावर विविध प्रकारची जास्त उत्पादन  घेणार्‍या प्रगतीशिल शेतकर्‍यांचा सत्कार करणे पंजाब सारख्या प्रगत राज्यातील शेती व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी पाच शेतकर्‍यांची निवड करून त्यांना  अभ्यास दौरा दरवर्षी पाठविणे अशा पुरक शेतकरी हिताच्या बाबींची अमलबजावणी होणार आहे.  आता आएसओ चे नामांकन मिळवुन घेण्यासाठी सभापती  उपसभापती व संचालक मंडळ सरसावले आहे. आएसओ च्या मुख्य परिक्षकांसह चमुने बुलडाणा बाजार समितीला भेट देवुन पाहणी केली आहे. 9 जानेवारी  याबाबत नॉमिनेशन झाले आहे. पुढील फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेपर्यंत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. हा निर्णय बाजार समितीकडे सकारात्मकरित्या  आल्यास ही बाब मौलाचा दगड ठरेल.