लातूर: ऑईल कंपनीतील विषारी वायूमुळे नऊ कामगारांचा मृत्यू
लातूर, दि. 31 - लातूरमधील किर्ती ऑईल मिलमध्ये टाकी साफ करताना नऊ कर्मचार्यांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
सोड्याची टाकी साफ करण्यासाठी काही कर्मचारी उतरले होते. पण टाकीत तयार झालेल्या विषारी वायूमुळे कर्मचारी बेशुद्ध पडले. बराच वेळ होऊनही कर्मचारी बाहेर का आले नाही, हे पाहण्यासाठी आणखी काही कर्मचारी आत उतरले. परंतु तेही बाहेर आले नाही. याची माहिती मिळताच मदतकार्य सुरु करण्यात आलं. मात्र विषारी वायूमुळे आत जाता येत नव्हतं. अखेर रात्री नऊच्या सुमारात सर्व नऊ कर्मचारी मृतावस्थेत आढळले.