Breaking News

बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे नवा संघर्ष रंगणार!

बीड, दि. 31 - बीड जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष आपण बघितला. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांचा संघर्ष तर सर्वश्रूत आहे. मात्र आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा नवा संघर्ष आता पाहायला मिळणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे सख्खे चुलत भाऊ अजय मुंडे आणि रामेश्‍वर मुंडे हे एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.